सोलापूर : बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत सोलापूरचे नावाजलेले बांधकाम व्यवसायिक दत्तात्रय मुळे यांनी बाजी मारली आहे. त्यांची बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
गुरुवारी मुंबईतील ताडदेव येथे असलेल्या असोसिएशनच्या मुख्यालयात मिलिंद मुळे हे राज्य अध्यक्ष पदाचा पदभार घेणार आहेत.
या निवडणुकीसाठी राज्यभरातून मतदान झाले, असोसिएशनच्या राज्यातील 81 सेंटर मधून प्रत्येकी पाच सभासदांनी मतदान केले त्यामध्ये राज्यभरातून तब्बल 70 टक्के मतदान एकट्या मुळे यांना झाले.
बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या इतिहासात राज्याचा अध्यक्ष होण्याचा मान सोलापूर जिल्ह्यातून कावळे आप्पा यांच्या नंतर केवळ दत्तात्रय मुळे (मामा) यांना मिळाला आहे. दत्तात्रय मुळे यांनी यापूर्वी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष तसेच सेंट्रल कौन्सिल मेंबर ही पदे त्यांनी भूषवली आहेत.



















