सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल देसाई यांच्यासह बार्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर सावंत या दोन्ही अधिकाऱ्यांना प्रमोशन पर बदली झाली आहे.
दोन्ही गटविकास अधिकाऱ्यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल देसाई यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत तर शेखर सावंत यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये राहुल देसाई आणि शेखर सावंत यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दक्षिण सोलापूर तालुका आणि बार्शी तालुक्यात काम केले होते.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने बुधवारी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या त्यामध्ये देसाई आणि सावंत यांचा समावेश आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्यात कोणालाही नियुक्ती देण्यात आली नाही, ही दोन्ही पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.
















