कोविड १९ बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस ( The Occupancy Of total oxygen Beds) व्यापलेली टक्केवारी नुसार शासनाने निश्चित केलेल्या एकूण पाच स्तरांपैकी सोलापूर जिल्हा ( सोलापूर महानगरपालिका क्षेत्र वगळून) ग्रामीण क्षेत्र तिस-या स्तरामध्ये येत आहे.
सोलापूर जिल्हयामध्ये ग्रामीण भागामाध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असल्याचे दिसून येते. सदरचा कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव आणखी पसरू नये व ज्यांना त्याची बाधा झाली आहे. त्या रुग्णांचा लवकरात लवकर उपचार व्हावा यासाठी तसेच तसेच तिसरी लाटेमध्ये लहान मुलांना कोविड १९ चा जास्त धोका होण्याची वर्तविली जात आहे. यासाठी लहान मुलांना त्वरीत उपचार मिळावा त्यासाठी आता पासून पूर्व तयारी करणे नोडल अधिकारी यांची नेमणूक करणे आवश्यक आहे.
सोलापूर जिल्हयाचे कोविड १९ बाबतचे कामकाज करणेकामी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करणेत येत आहे. असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत.





















