सोलापूर : महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीत जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हजेरी लावली. यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या मिरवणुकीत मामा सहभागी झाल्याने चंदनशिवे यांचा चेहऱ्यावरील ‘आनंद’ पाहण्यासारखा होता चंदनशीवे यांच्या पिबी ग्रुपच्या डॉल्बीवर राष्ट्रवादी पुन्हा हे गाणे वाजले आणि पालकमंत्री भरणे मामा सर्वच नेते थिरकले


















