सोलापूर शहर हद्द वगळून ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायत ,नगरपालिका ,नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीत कृषी विषयक बियाणे, खते, कीटकनाशके, शेतीशी निगडित असलेली कृषी सेवा केंद्र हे आता यापुढे सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, सर्व कृषी सेवा, केंद्र चालक या ठिकाणी काम करणारे तसेच शेतकरी यांनी मुख्यपट्टी बांधणे बंधनकारक असेल,
कृषी सेवा केंद्राच्या ठिकाणी वावरताना कृषी सेवा केंद्र चालक कामगार व शेतकरी यांनी दोन व्यक्ती मध्ये किमान सहा फुटाचे सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक आहे,
कृषी सेवा केंद्रा वरील गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना वेळ देऊन त्यानुसार कृषी निविष्ठा वाटपाचे नियोजन करावे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवार दिनांक 19 मे रोजी काढलेला आदेश पहा.


















