शिवसेनेचे जिल्हा युवा सेना प्रमुख मनीष काळजे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली फौजदार चावडी पोलीस ठाण्यात बाजार समितीचे संचालक प्रकाश मानकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर व दत्तात्रय वानकर यांच्यासह इतर 4 जणांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनीष काळजे यांनी स्वतः या प्रकरणात फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीत त्यांनी काळजे हे शनिवारी 14 ऑगस्ट रोजी रात्री 9 च्या सुमारास आपल्या वाहन चालक गोरखनाथ कोळी यांच्या सह एम एच 23 डी 808 या वाहनातून येत असताना ते सोलापूर मंगळवेढा रोडवरील इंद्रधनु अपार्टमेंट समोर एक पांढऱ्या रंगाची ब्रिझा गाडी (क्रमांक एम एच 13, 0550) आडवी करून एकाने गाडीची काच दगडाने फोडली, दुसर्याने आतील काळजे यास बाहेर ओढले त्यांच्या तोंडावर चापटा मारल्या, तिसऱ्याने पिस्टल सारख्या शस्त्राने तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला, नंतर तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
मागील काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत त्यामध्ये मनीष काळजे हे विरोधी गटात आहेत, तेव्हापासूनच खटके उडत होते दरम्यान शासकीय विश्रामगृहावर काही दिवसापूर्वी युवा सेनेचे जिल्ह्याचे निरीक्षक बैठकीसाठी आले असता वानकर गट आणि काळजी गटामध्ये एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली त्यामध्ये वानकर गटाच्या कार्यकर्त्यांनी मनीष काळजे हटावच्या घोषणा दिल्या, त्यामुळे निरीक्षकांनी बैठक रद्द केली, यानंतर हा वाद चांगलाच पेटला आणि त्याचे रूपांतर शनिवारी झालेल्या भांडणात झाले.



















