सोलापूर : कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने मोहोळ येथील सब जेल मधील कैद्याला सोलापूर शहरातील कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी ठेवले असता सर्वांची नजर चुकवून तो शौचालयाची खिडकी तोडून पळाल्याची घटना घडली आहे. पॉझिटिव्ह कैदी पळून जाण्याची ही सोलापुरातील मागच्या महिन्याभरात दुसरी घटना आहे
विजय कुंडलिक गायकवाड, वय २९ वर्षे, रा. मु. पो. मंगळुर, ता. माजलगाव, जि.बीड असे पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे.
अविराज सुरेश राठोड, नेम- मोहोळ पोलीस स्टेशन, सोलापूर ग्रामीण यांनी फिर्याद दिली आहे. २२/०१/२०२२ रोजी सकाळी साडे आठ ते पावणे नऊचे दरम्यान, केटरिंग कॉलेज (कॉरन्टाईन सेंटर), कंबर तलावजवळ, विजापूर रोड, सोलापूर येथून हा कैदी पळाला आहे.
कामती पोलीस ठाणे भादविसंक ४२० मधील मोहोळ तालुका सबजेल येथील आरोपी हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने उपचाराकरीता त्यास केटरिंग कॉलेज या ठिकाणी दाखल केले होते. हा आरोपी प्रातंविधी करीता सकाळी ०८.३० वा ते ०८.४५ वा चे सुमारास बाहेर काढले असता नजर चुकवुन कोव्हीड सेंटर मधून शौचालय मधील खिडकी मधुन कायदेशीर रखवालीतुन पळुन गेला आहे.


















