सोलापूर शहरातील काँग्रेस भवना समोर सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री साखर कारखान्याने बिले न दिल्याच्या निषेधार्थ तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, दरम्यान त्या आंदोलनाला शुक्रवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली, निवेदन घेतले, चर्चा केली याचा पाठपुरावा करेन आणि बिले द्यावीच लागेल अशी भूमिका मांडली…


















