सोलापूर : थकीत वीज बिल भरण्यासाठी महावितरणने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप माने यांनी दक्षिण व उत्तर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांसह सोमवारी वीज वितरणच्या मुख्य कार्यालयात दाखल झाले.
एक प्रकारे मोर्चा काढून माने शेतकऱ्यांसोबत कार्यालयात दाखल झाले. यावेळी सभापती रजनी भडकुंबे, लता जावीर यांची उपस्थिती होती. सर्व शेतकरी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्या कार्यालयात दाखल झाले. दिलीप माने यांनी कोणताही वाद न घालता वीज सुरू करावी अन्यथा आम्ही इथून उठणार नाही अशी भूमिका घेत ठिय्या मांडला.. पहा काय म्हणाले, दिलीप माने…

















