Wednesday, March 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! आमदार प्रणिती शिंदे व उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यात महत्वाची चर्चा ; सोलापूरसाठी झाला हा निर्णय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 July 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 “सोलापूर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या आवारात एकत्रितपणे, सन 2022-23 मध्ये पॉलिटेक्निक सोबत इंजिनिअरींग कॉलेजही सुरु होणार”

आ. प्रणिती शिंदे व उच्च तंत्रशिक्षण मंत्री मा. उदय सामंत यांच्याबैठकीमध्ये तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचा झाला निर्णय”

मुंबई :  05 जुलै 2021 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर येथे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सोबत गव्हर्नमेंट इंजिनिअरींग कॉलेज सुरु करण्याकरीता मा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  उदय सामंत साहेब यांच्या समवेत संबंधित अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सोलापूरातील पॉलिटेक्निक बंद न करण्याचा व तसेच नवीन इंजिनिअरींग कॉलेज सूरू करण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश संचालक, तंत्रशिक्षण श्री. धनराज माने यांना देण्यात आले.

  या बैठकीमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी आपली भुमिका मांडताना सांगितले कि, महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग निर्णय क्र. मान्यता 2015/(143/2015) /ताशि-5/दिनांक.13.10.2016 या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाअंतर्गत सोलापूर येथे गव्हर्नमेंट इंजिनिअरींग कॉलेज स्थापन करण्याचा निर्णय स्वागतार्ह होता पण यासोबतच सोलापूर येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अभ्यासक्रम हा टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता जो अत्यंत चुकीचा व गोर-गरीब विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असा होता. सोलापूर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज बंद करण्यात येऊ नये यासंदर्भात विविध विद्यार्थी संघटना व असंख्य पालकांनी निवेदनाव्दारे, प्रत्यक्ष भेटून मागणी केलेली आहे, असे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.  

श्रेणी वर्धनामुळे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज मधील पदवीका अभ्यासक्रम बंद केला गेला असता तर गरीब व हुशार विद्यार्थ्यांना खाजगी पॉलिटेक्निक मध्ये अवाढव्य शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागला असता किंवा त्यांना शिक्षणपासून वंचित रहावे लागले असते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील गरीब व हुशार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी इतर जिल्ह्यातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये 30 % कोठयामध्ये स्पर्धा करावी लागली असती. परिणामी सोलापूरातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले असते.

गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज ही संस्था सन 1956 पासून चालू असून तेथे स्थापत्य, संगणक, विद्युत, अनुविद्युत व दुरसंचारण, यंत्र, माहिती तंत्रज्ञान व वस्त्रनिर्माण असे पदवीका अभ्यासक्रम संपूर्ण क्षमतेने यशस्वीरित्या सुरु आहे. या संस्थेमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून इ. 10 वी, 12 वी व आय.टी.आय. नंतरचे विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामध्ये ग्रामीण भागातील व शहरातील गरीब परंतू हुशार विद्यार्थी ज्यांना पदविका अभ्यासक्रमानंतर नोकरीची गरज असते अशा विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक हा चांगला पर्याय आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथे अत्यल्प व माफक शैक्षणिक शुल्कात शिक्षण दिले जाते व सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 70 % विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.

या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संचालक तंत्रशिक्षण धनराज माने यांना सन 2022-23 साठी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक व इंजिनिअरींग कॉलेज एकाच आवारामध्ये सुरु करण्याकरीता तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सोलापूरातील हजारो विद्यार्थ्यांना सन 2022-23 पासून गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सोबत गव्हर्नमेंट इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शासकीय सवलतीनुसार शिक्षण मिळणार आहे. या निर्णयामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून सर्वांनी आमदार प्रणिती शिंदे यांना प्रामाणिक प्रयत्न केल्याबद्दल मनापासून धन्यवाद दिले आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

बिग ब्रेकिंग : माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्यासह भाजपचे 12 आमदार 1 वर्षासाठी निलंबित

Next Post

आणि…आमदार प्रणिती शिंदे बसल्या विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर ; पहा हा व्हिडीओ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आणि...आमदार प्रणिती शिंदे बसल्या विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर ; पहा हा व्हिडीओ

ताज्या बातम्या

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971302
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group