सोलापूर : सात रस्ता बस डेपो मागील बाजूस असलेल्या नाल्यात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. नागरिकांनी पाहिल्यानंतर हा युवक लष्कर परिसरातील असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.
आकाश प्रताप कोलाकट्टी वय वर्षे 28 असे मयत युवकाचे नाव परिचयाच्या लोकांकडून समोर आले आहे. सदर घटना मंगळवारी सकाळी 9 वाजता उघडकीस आली. याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली त्यांनतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि लादेन या रुग्णसेवकास पाचारण करण्यात आले.
लादेन याने सदर मृतदेहास दोरखंड बांधून नाल्यातून बाहेर काढले. त्यांनतर याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली. सदर मृतदेह सिव्हील हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.



















