सोलापूर – कर्नाटकात समान गणवेशासाठी भगव्या शाळेचे आंदोलन उभे करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते 26 वर्षे हर्षा याची कर्नाटकातील शिवमोगा शहरात जिहादी विचारधारेच्या लोकांकडून हत्या करण्यात आली. या हत्येचा सर्वत्र तीव्र निषेध केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापुरात बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली दरम्यान विश्व हिंदू परिषद तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी हर्षा च्या हत्येचा जाहीर निषेध करीत संबंधित हल्लेखोरांवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. हर्षा हा कट्टर हिंदुत्ववादी आणि बजरंग दलाचा युवा कार्यकर्ता होता घडलेली घटना ही हिंदुस्थानाच्या दृष्टिकोनाने खूप निंदनीय आणि भयानक प्रकार आहे हिंदुत्ववादी संघटना असे कृत्य सहन करणार नाही जशास तसे उत्तर देण्याची तयारी आमची देखील आहे अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या निषेध मोर्चात सहभागी झाले होते.
















