सोलापूर : विजापूर रोडवरील फुरडे रेसिडन्सीजवळील महालक्ष्मीनगर सोलापूर याठिकाणी बेकायदेशीरपणे कुंटणखाना चालु असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. या बातमीवरुन ०७ जून २०२२ रोजी दुपारी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस निरिक्षक कुर्री व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी सदर ठिकाणी छापा टाकण्याकरिता सापळा रचून महालक्ष्मी नगर येथील आरोपी नामे वर्षा दत्ता माशाळे हिचे राहते घरात बोगस ग्राहक पाठवून बातमीची खात्री करुन १३.५५ वा छापा टाकण्यात आला.
यातील महिला आरोपी नामे १) वर्षा दत्ता माशाळे वय ३२ वर्षे राहणार महालक्ष्मी नगर फुरडे रेसिडन्सी जवळ विजापूर रोड सोलापूर २) महिला आरोपी नामे सुजाता विवेक कांबळे वय ३३ राहणार स्वामी विवेकानंद नगर ओमगर्जना चौकाजवळ सोलापूर यानी पिडीत महिला हिची शारीरीक पिळवणूक करुन तिस वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेवून तिचे कमाईवर स्वतःची उपजिविका करीत असताना मिळून आल्याने सदर आरोपीविरुध्द विजापूर नाका पोलीस ठाणे येथे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ व ६ सह भादविसंक. ३७० (अ) (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हयाचा तपास पोलीस निरिक्षक श्रीमती कुर्री या करीत असून आरोपीना न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीची गुन्हयाचे तपासकामी ०३ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे.
ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरिक्षक विजयालक्ष्मी कुर्री व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोहेकॉ बंडगर, पोना अ. सत्तार पटेल, मपोना गवळी, मपोना मुजावर, मपोशि मंडलिक, मपोशि उषा माळगे, मपोशि सिमा खोगरे, मपोशि शैला चिकमळ व चालक पोशि गोरे यांनी शिताफिने कामगीरी करून सदरचा छापा यशस्वी केला.