सोलापूर, ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या पावन सोनलगी नगरीत पर्यटन क्षेत्रात मोठी भर घालणारे सोनलगी अॅक्वापार्क प्रायव्हेट लिमिटेड संचलित शॉवर अॅन्ड टॉवर वॉटर पार्क सोलापूर तुळजापूर रस्त्यावरील तळेहिप्परगा येथे तयार करण्यात आले असून सोमवार दि.९ मे २०२२ रोजी सिने अभिनेते रितेश देशमुख यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बॉलिवुडचा सुपरस्टार रितेश देशमुख यांच्या हस्ते तर माजी आमदार दिलीपर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि सोलापूरच्या कर्तव्यनिष्ठ आमदार प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त हरिष बैजल, मनपा आयुक्त पी शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कायकवे कैलास हा मंत्र देणारे सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर, शक्तीपीठ असलेल्या तुळजाभवानी, भक्तीचा झरा असलेले पंढरपूर आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणारे स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोट, श्रीदत्त गुरूचे जागृत गाणगापूर असे धार्मिक पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या सोलापूरकरांना मनोरंजनासाठी मोठ्या शहरात आणि वॉटर पार्क असलेल्या ठिकाणी जावे लागत होते. परंतु सोन्नलगी ऑक्का प्रायव्हेट लिमिटेडने ही कमतरता शॉवर अॅन्ड टॉवर या वॉटर पार्कच्या माध्यमातून भरून काढली आहे.
*आंतरराष्ट्रीय दर्जाचे सोलापूर मधील एकमेव वॉटर पार्क*
अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले आणि जगातील अमेरिका, ब्रझिल, सिंगापूर, स्पेन या ठिकाणी ज्या SHOWER TOWER प्रमाणे वॉटर पार्क आहे त्याप्रमाणे सोन्नलगीचे हे शॉवर अॅन्ड टॉवर वॉटर पार्क आहे. यामध्ये विविध प्रकारच्या २१ स्लाईड. या सर्व स्लाईड तीन गटात विभागण्यात आलेल्या आहेत. लहान मुलांसाठी बेबी स्लाईड, चाळीस वर्षावरील नागरीकांसाठी सॉफ्ट स्लाईड तर युवा वर्गासाठी साहस दाखवण्यासाठी अॅडव्हेंचर स्लाईड अशा तीन स्लाईड आहेत. समुद्राच्या लाटांचा अनुभवही सोलापूरच्या या वॉटर पार्कमध्ये घेता येणार आहे. त्याचबरोबर दिव्यांगानाही वॉटरपार्कचा आनंद घेता यावा म्हणून १५ प्रकारच्या स्लाईड उलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
या वॉटर पार्कमध्ये मनोरंजना बरोबर पोट पूजेकडेही लक्ष देण्यात आले असून त्यासाठी शाकाहारी निटनेटके असे दोन रेस्टॉरंट, स्वतंत्र कॉफी शॉप आहेत. या वॉटर पार्कमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी विशेष सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये चेंजिंग रूम्स, लॉकर रूम्स, शॉवर एरिया, वॉशरूम, बेबी केअर रूम, प्रशिक्षित आणि नम्र कर्मचारी वर्ग अशा सुविधा तयार करण्यात आले असल्याची माहिती सोनलगी अॅक्वापार्क प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विश्वशंकर चाकोते यांनी दिली. सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरीकांनी आता वॉटर पार्कसाठी सोलापूरच्या बाहेर जायचे नाही सोलापूर शहरातच अत्याधुनिक आणि नव्या तंत्रज्ञानासह सुरक्षित असे शॉवर अॅन्ड टॉवर वॉटर पार्क सुरू करण्यात येत आहे त्याला आपण आपल्या परिवारासह तसेच
नातेवाईक मित्रांसह अवश्य भेट द्या. सोन्नलगी वॉटर पार्क मध्ये विवाह सोहळे, कार्पोरेट कार्यक्रम, शाळांची सहल असे विविध उपक्रमही मोठ्याप्रमाणात करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला विश्वराज चाकोते विश्वनाथ चाकोते अंबादास गुंतीकोडा, सिद्धेश्वर कणगी, मल्लिकार्जुन गुरव उपस्थित होते.



















