सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांची गुरुवारी बदली झाली त्यांच्या जागेवर वस्त्रोद्योग नागपूर विभागाच्या संचालक शितल तेली-उगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उगले यांच्या जागेवर महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी पदभार घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शीतल उगले या सोलापूर महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त आहेत.
राज्याचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी गुरुवारी दोन आदेश काढले एकामध्ये महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांची बदली नागपूर वस्त्रोद्योग संचालक पदावर करण्यात आली. त्यानंतर काही वेळाने वस्त्रोद्योग संचालक शितल उगले यांना सोलापूरच्या महापालिका आयुक्त म्हणून दुसरे पत्र काढण्यात आले.



















