राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार हे येत्या 9 ऑक्टोबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार होते मात्र त्याऐवजी ते आदल्या दिवशी म्हणजे आठ ऑक्टोबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत.
मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते काका साठे यांच्या कार्यालयात जिल्हा कार्यकारिणीची बैठक होऊन नियोजन करण्यात आले होते मात्र बुधवारी परत काका साठे यांनी आपल्या कार्यालयात काही ठराविक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि नऊ तारखेचा दौरा रद्द झाला आणि आता ते आठ तारखेला येणार असल्याने आठ तारखेचे नियोजन करण्यात आले आहे.
कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी सोलापुरातील हुतात्मा स्मृतिमंदिर घेण्याचे नियोजन सुरू आहे त्यासाठी पदाधिकार्यांची पळापळ दिसून आली नऊ तारखेचे जे कार्यक्रम ठरलेले आहेत तेच आठ तारखेला होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

















