सोलापूर : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची बैठक रविवारी रात्री शासकीय विश्रामगृहावर संपन्न झाली. या बैठकीला धनगर समाजातील विविध पक्षातील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यंदाच्या अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव अध्यक्षपदी सुजित कोकरे यांची निवड झाली. कार्याध्यक्ष पदावर गुरु कावडे, सेक्रेटरी पदावर सुधीर घोडके, खजिनदार म्हणून सिद्धारूढ बेडगनूर, उपाध्यक्षपदी संतोष माने, सुभाष हक्के, योगेश कटके, चेतन माने तर मिरवणूक प्रमुख पदी शेखर बंगाळे, मल्लू पांढरे आणि प्रसिद्धीप्रमुख उमेश कोळेकर व बाळासाहेब वाघमोडे यांच्या निवडी एकमताने करण्यात आल्या. निवडीनंतर उपस्थित समाजातील मान्यवरांनी सर्वांचा सत्कार केला.
यावेळी सुरेश पाटील, चेतन नरोटे, अर्जुन सलगर, अनिकेत पिसे, दीपक राजगे, गणेश नरोटे, सुनील खटके, अमोल कारंडे, संतोष वाकसे, राजकुमार पाटील, मनीषा माने, शशिकला कसपटे, शेखर बंगाळे, शिवाजी वाघमोडे, सागर पिसे, निमिषा वाघमोडे, विजयकुमार गावडे, राम वाकसे, केदार पुजारी, नारायण माशाळकर, संजय कणके, नवनाथ बंने, जयवंत सलगर,अमर दुधाळ त्यांच्यासह धनगर समाजातील विविध क्षेत्रातील तसेच विविध पक्षातील मान्यवर मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते.
राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन कोणत्याही परिस्थितीत 31 मे च्या आत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री भरणे मामा हे एकमेव धनगर समाजाचे आमदार आहेत त्यांचा समाजातून सन्मान होणे गरजेचे आहे, असे सांगतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत ज्या पद्धतीने मामा यांनी नृत्य करून उत्साह वाढवला त्याच पद्धतीने आपल्याही मिरवणुकीत त्यांना नाचवायचेच अशी भाषा यावेळी नेत्यांमधून समोर आली.




















