सोलापूर : युवा पॅंथर चे जिल्हाध्यक्ष दीपक गवळी यांना एका बँकेमध्ये मारहाण झाल्याचे समोर आले आहे. या मारहाणीत त्यांना मुक्का मार लागल्याने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
दीपक गवळी यांच्या आई या एका कर्ज प्रकरणात जामीन आहेत, त्या संदर्भात मंगळवारी दुपारी विचारण्यासाठी ‘त्या’ बँकेमध्ये गेले असता त्या ठिकाणी वाद झाला या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी संबंधित बँक आणि त्या बँकेच्या चेअरमन विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी दीपक गवळी हे सदर बाजार पोलिस ठाण्यात गेले असता त्यांना पोलिसांनी प्रथम सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यासाठी पाठवले आता दीपक गवळी हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. दरम्यान याबाबत स्वतः दीपक गवळी यांनी या प्रकरणाची अधिक माहिती दिली…
















