सोलापूर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्त पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी बोलावलेल्या बैठकीत या मिरवणुकीत डॉल्बी ला बंदी राहणार अशी भूमिका आयुक्तांनी घेतली. यानंतर उपस्थित सर्वच मंडळाचे पदाधिकारी आयुक्त कार्यालयातून निघून गेले, पुढे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली या बैठकीला आनंद चंदनशिवे, उत्सव अध्यक्ष रॉकी बंगाळे ,मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, एन के शिरसागर, मिलिंद प्रक्षाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व इतर या मंडळाचे सदस्य उपस्थित होते या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिरवणुकीत दोन बेस दोन टॉप यांना परवानगी मिळाली पाहिजे अशी घोषणाबाजी करण्यात आली…


















