सोलापूर : तुम्ही आमचे मंडळाची वर्गणी दिली नाही तर आम्ही तुमचे दुकान चालू देणार नाही तुम्ही येथे कसे काम करता हे बघतो अशी धमकी देत 21 हजार रुपये आंबेडकर जयंतीची वर्गणी जबरदस्तीने मागितल्या बद्दल जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
राजुराम शंकरराम खोत, वय-३० सुयोग श्रृष्टी अपार्टमेंट दयानंद कॉलेज, शेळगी रोड, जागृती मंदिर समोर,यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिंटू कांबळे यांचे सोबत असलेले इतर ०२ पुर्ण नाव पत्ता माहित नाही यांच्यावर भादविक ३८४ कलमान्वये करण्यात आला आहे
फिर्यादी व फिर्यादीचे सोबतचे मॅनेजर निलेश भुतडा, बिलींग काम करणारा इम्तियाज तांबोळी, मंजु, स्वामी, समीर तांबोळी असे सोलापूर टेक्सटाईल मार्केट दुकानात काम करत असताना चिंटु कांबळे व त्यासोबतचे इतर २ अनोळखी इसम हे दुकानात येवून फिर्यादीस तुझे मालकाला फोन लावून दे असे म्हणाले असता फिर्यादीने फोन लावून दिला नाही तेव्हा त्यानी फिर्यादीशी वाद घालून दि ०७/०४/२०२२ रोजी दिलेले छत्रपती शाहु महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ न्यु बुधवार पेठ सोलापूर या मंडळाचे २१,००० रूपये वर्गणीचे पावतीचे पैसे दया तुम्ही आमचे मंडळाची वर्गणी दिली नाही तर आम्ही तुमचे दुकान चालू देणार नाही तुम्ही यथे कसे काम करता हे बघतो अशी धमकी देवून निघून गेले आहेत.

















