सोलापूर : जिल्ह्यातील अक्कलकोट ते दुधनी रोडवर सकाळी साडेदहा वाजता एसटी बस पलटी होऊन सहा जण जखमी झाले तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. हा अपघात कल्लप्पावाडी या गावाजवळ झाला.
एसटी क्रमांक एम एच 12 इ एफ 6498 ही एस टी बस पलटी झाली आहे. या अपघातात विजयंती बनसोडे वय 35, ओंकार बनसोडे वय 13, भाग्यश्री बनसोडे वय 26, कस्तुरबाई बनसोडे वय 65, सुनीता पवार वय 43, रमा पवार वय 56 अशी जखमींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच डॉक्टर मुबिन मनियार व पायलट संदीप बाळशंकर यांनी 108 क्रमांकाच्या 2 अंबुलन्समध्ये सर्व जखमींना पुढील उपचारासाठी अक्कलकोट येथे हलवण्यात आले असून 2 गंभीर जखमींना सोलापूर सिविल हॉस्पिटल कडे पाठवण्यात आले आहे.




















