सोलापूर : कृषी संजीवनी उपक्रमाअंतर्गत शासनाच्या विविध योजनांबाबत शेतकर्यांना जागृती करण्यात आली. यावेळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन भारत कवडे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कृषि दिन व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी शेतकर्यांना पिक उत्पादन वाढिचे सुधारित तंत्रज्ञान,बीजप्रक्रिया,सोयाबीन उगवणक्षमता,रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड,महाडीबीटी पोर्टल वरील अनुदानाच्या सर्व योजना व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले .
याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक कोटगोंडे ,कृषी सहायक संतोष पवार ,शंकर चव्हाण,विनोद धुळे,महादेव पोरे,संभाजी कंदगुळे,सुदर्शन गुंडले,सुनिल गायकवाड , प्रगतशील शेतकरी श्याम भोसले, बंडू मस्के ,राम गोसावी ,बोला चव्हाण ,सोमा मस्के ,दत्ता शेळके , सोसायटीचे सचिव रमेश मोहिते , कृषि सहाय्यक शशिकांत राठोड आदी उपस्थित होते.

















