सोलापूर : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये काँग्रेसचे नगरसेवक बेरिया यांनी पाणीपुरवठा वरून सत्ताधारी भाजपला चांगलेच लक्ष केले. पाच वर्षात जनतेला दिलेला कोणताही शब्द पाळला नाही. पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत, तुम्ही सपशेल अपयशी ठरलात, असे बोलताच भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील संतापले, आम्ही विरोधी पक्ष असताना बरंच काही केलं या मागच्या पाच वर्षांमध्ये तुम्ही काय केलं असा उलट सवाल केला. यावरून दोघांमध्ये चांगलेच शीतयुद्ध पेटले सुरेश पाटील यांनी बेरिया यांना चांगले सुनावले, मी माकड उड्या मारत नाही, कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादी असे करत नाही एका बापाची औलाद आहे, जनतेतून निवडून येणारा नेता आहे, कधी मागच्या दाराने गेलो नाही, कधी सुशीलकुमार शिंदे यांना चांगले म्हणायचे कधी शरद पवार चांगले तर कधी उद्धव ठाकरे असे म्हणून सभागृहात टर उडवली. बेरिया यांनी सुद्धा मालक खूष झाले, बाटली कोण फेकली, महापौरांचा अपमान कुणी केला असे म्हणून पाटलांना टार्गेट केले.. या दोघांमध्ये वाद सुरू असताना सभागृहात सर्व जण मात्र मजा घेत होते बेरिया यांना कोणीही टेकन दिले नाही मात्र तोफिक शेख यांनी त्यांची बाजू घेऊन टेकन देण्याचा प्रयत्न केला पहा मजेदार व्हिडीओ
















