सोलापूर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्राध्यापक ढोबळे हे जयंतीच्या शुभेच्छा देताना म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनंत उपकार या देशावर आहेत. बॅरिस्टर आंबेडकर व बॅरिस्टर सावरकर हे जर देशाला कळाले असते तर आज चीन आणि पाक सारख्या देशाचं गुरगुरण, दुरखनं अजिबात झालं नसतं.


















