भंडारकवठे :- दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाळगी विकास संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक लागली असून डाॅ.बसवराज बगले आणि कैलास पाटील यांच्या पॅनेल मध्ये दुरंगी सामना होणार आहे.12 जागांसाठी दोन्ही गटाकडून 24 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
मागील सहा महिन्यापूर्वीच बाळगी विकास संस्थेची निवडणूक पार पडली होती.त्यावेळेस माजी चेअरमन हणमंतराव पाटील आणि रमेश बबलेश्वर यांनी एकत्रपणे निवडणूक बिनविरोध केली होती.मात्र डाॅ.बसवराज बगले आणि अमोगसिध्द बगले यांच्यात एका जागेसाठी निवडणूक लागली होती. त्यानंतर झालेल्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत मल्लेशा बबलेश्वर यांची बहुमताने निवड झाली होती.तर कैलास पाटील यांनी अचानक चेअरमन पदावर दावा केल्यामुळे केवळ 5 मते घेऊन ते पराभूत झाले होते.पराभवाचे शल्य सहन न झाल्याने पाटील गटाने राजिनामा दिला.त्यामुळे संस्थेचे संचालक मंडळ अल्पमतात आले म्हणून सहाय्यक निबंधकांनी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती.त्यामुळे 6 महिने संस्थेचा कारभार ठप्प झाल्याने सभासद शेतकऱ्यांचे कर्जवाटप खंडीत झाले होते.
आत्ता पुन्हा संचालक मंडळाची निवडणूक लागली असून नामनिर्देशनपत्र मागे घ्यावयाच्या अखेरच्या दिवशी 12 जागांसाठी दोन्ही गटाकडून एकूण 24 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.पाटील गटाने हरकत घेतल्यामुळे बगले गटाचे कोळी समाजाचे उमेदवार सिद्राया कोळी यांना उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. त्यामुळे सायबण्णा कोळी हा उमेदवार बिनविरोध झाला आहे.
मागील वेळी बिनविरोध झालेले आणि विनाकारण संचालक पदाचा राजिनामा दिलेले कैलास पाटील यांच्यासह तब्बल 6 उमेदवार पुन्हा निवडणुकीत आपले अर्ज ठेवले आहेत. “ताईबाई शेतकरी विकास ” पॅनेलकडून बसवराज बगले यांनी तगडे उमेदवार रिंगणात उतरवल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे.
बगले गटाचे उमेदवार – सर्वश्री मल्लेशा बबलेश्वर,व्हन्नप्पा बगले, अमोगसिध्द कस्तुरे, बाळासाहेब पाटील,भीमाशंकर पिरगोंडे, मल्लिकार्जुन कस्तुरे,विलास झाडबुके, रत्नाबाई पाटील,स्वाती बगले, चंपावती राजमाने, डाॅ.बसवराज बगले आणि रामचंद्र उर्फ सचिन पाटील असे आहेत.
पाटील गटाचे उमेदवार – सर्वश्री कैलासनाथ पाटील, डाॅ.निलेश पाटील,वर्षा पाटील, महादेव बिडवे,शिवप्पा बिज्जरगी, विठ्ठल कोळी,रंजना कुंभारे, शिवयोगी पीरगोंडे, अनिता बगले,स्वाती पांढरे,श्रीशैल बुगडे आणि प्रथमेश पाटील असे आहेत. 26 मार्च रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल घोषित होणार आहे.

















