सोलापूर : जिल्हा परिषदेत मागील आठवड्यात एक अशी घटना घडली की, सर्वच पाहून आश्चर्यचकीत झाले. ते दृश्य तसेच होते. एक उंचीपुरा युवक जिल्हा परिषदेत चालत आला, त्याच्या उंचीकडे सर्वच पहात राहिले, कारण त्याची उंचीच तशी होती. तो जेव्हा पत्रकारांच्या जवळ आला तेव्हा त्याला पत्रकारांनी तुमची उंची किती? हे विचारले, तेव्हा त्याने 6 फूट 10 इंच सांगितले.
त्या युवकाचे नाव होते, यशवंत राऊत. तो राहणार सोलापूरचा आहे. जिल्हा परिषदेमध्ये काही कामानिमित्त युवक आला होता. यावेळी तो चर्चेचा विषय ठरला. प्रत्येक जण त्याच्या शेजारी उभारून आपल्यापेक्षा किती उंच आहे हे पाहत होते. काही पत्रकारांनी ही त्यांच्या शेजारी उभारून आपले फोटो काढले.


















