सोलापूर | धूम्रपानामुळे कोरोना होत आहे असा तर्क लावत स्नेहा मार्जाडी यांनी मुबंई उच्च न्यायालयात विडी विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात यावी म्हणून 20 एप्रिल 21 रोजी महाराष्ट्र राज्य सरकार आणि अन्य यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली असून यावर पाच वेळा सुनावणी झाली आहे.
25 जून रोजी मुख्य न्यायाधीश अंतिम आदेश देणार आहेत. याबाबत 24 जून पर्यंत राज्य सरकारची बाजू ऐकण्याची वेळ दिली आहे.त्याआधी राज्य सरकारने आपले म्हणणे सादर करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मुदत दिली आहे.जेणेकरून महाराष्ट्र राज्यातील साडेतीन लाख विडी कामगारांचा रोजगार वाचवण्यासाठी कामगारांची बाजू मांडली पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी या सिटूच्या वतीने बुधवार 23 जून रोजी सकाळी 11 वाजता कामगार नेते आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली राज्य महासचिव ऍड एम एच शेख, नगरसेविका कामिनी आडम, युसूफ मेजर, नसीमा शेख, सुनंदा बल्ला, सिद्धप्पा कलशेट्टी, अनिल वासम, अकिल शेख यांच्या उपस्थितीत 10 हजार विडी कामगार महिलांचे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारने जर विडी कामगारांच्या हिताचे प्रतिज्ञापत्र दाखल न केल्यास 50 हजार महिलांना घेऊन होम मैदानावर बेमुदत उपोषण करण्याचा कामगार नेते आडम मास्तर यांनी दिला..


















