सोलापूर: जिल्ह्यात पावसाळी हवामान निर्माण झाल्यामुळे बेदाण्याचा भाव घसरला आहे. गुरुवारी बाजार समितीत झालेल्या लिलावामध्ये बेदाण्याला 40 ते 195 रुपये किलो असा भाव मिळाला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत विज्ञानाचा 9वा लिलाव झाला यासाठी शेतकऱ्यांनी आठ अडत्यांकडे 398 टन बेदाणा विक्रीला आणला होता. त्यापैकी केवळ 198 टन बेदाणा विकला गेला, यातून दोन कोटी 23 लाखांची उलाढाल झाली. मे महिन्यात वाढत्या तापमानामुळे बेदाण्याचे दर घसरत गेले आहेत सुरुवातीला 50 ते 300 रुपये असलेला बेदाण्याचा भाव आता 40 ते 195 रुपयांवर आला आहे सर्वसाधारण बेदाना 140 रुपये विकला जात आहे पावसाळी हवामानामुळे आता बेदाण्याचे भाव घसरले आहेत
पावसाळी हवामानामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचे सुभाष माने यांनी सांगितले. शेतात अध्याप द्राक्षाचे पीक आहे. मार्च-एप्रिलमध्ये कलिंगडची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यामुळे द्राक्षाचे भाव घसरले. आता कलिंगड, टरबूजचेही भाव घसरले आहेत. आंबा बाजारात आल्यामुळे द्राक्षांची मागणी घटली आहे. बागेत 30 ते 35 रुपये किलोने द्राक्षे व्यापारी मागत आहेत. त्यामुळे बेदाणाकडे शेतकरी वळत आहेत. पावसाळा सुरू झाल्यावर बेदाणा व द्राक्षाचे भाव आणखी खाली येतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.


















