Saturday, March 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बांधकाम, आरोग्य, शिक्षण, समाज कल्याणला भरीव तरतूद ; सोलापूर जिल्हा परिषदेचे बजेट सादर ; मागासवर्गीय बचतगटांना केटरिंग साहित्य, समाज मंदिरांना वाचनालये तर भजनी मंडळांना साहित्य

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 March 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 






सोलापूर : जिल्हा परिषदेचे सन 2023-24 या आर्थिक वर्षाचे सेस फंडाचे 44 कोटीं 94 लाखाचे अंदाजपत्रक प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी सोमवारी सादर केले. 11 लाखाचे शिलकी अंदाजपत्रक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सभागृहात मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार, सभेचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सानिया बागडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ नरळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वटारे, कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार, महिला बालविकास अधिकारी जावेद शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, उपमुख्य लेखाधिकारी उत्तम सुर्वे यांच्यासह सर्व तालुक्याचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.


2022-23 चे सुधारित तर सन 2023-24 चे मूळ अंदाजपत्रक 


सन २०२३-२४ चे मुळ अंदाजपत्रकातील विभागनिहाय योजना खालीलप्रमाणे आहेत.

कृषि विभाग :- कृषि विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीमध्ये वाढ करुन एकूण रु.३७०.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.

कृषि अभियांत्रिकी योजनेंतर्गत ट्रैक्टर चलित औजारे, ट्रैक्टर, रोटावेटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र रोटरी टिलर यासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. जेणेकरून सोलापूर जिल्हयातील शेतकऱ्यांना आधुनिक औजारांचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल.

• शेतकरी व पशुपालक यांचेसाठी कडबाकुट्टी, ताडपत्री, स्लरी फिल्टर या सुधारित औजारांचा वापर व्हावा, म्हणून रक्कम रुपये ५.०० लक्ष इतकी रक्कम वाढ करुन रक्कम रु. ११०.०० लक्षची भरीव तरतूद केलेली आहे. • तसेच पीक विविधकरण अंतर्गत कडधान्य व गळीत धान्य पीकामध्ये विविधकरण करणे या नविन योजनेचा अंतर्भाव करुन त्यासाठी रक्कम रु.१०.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.


* पशुसंवर्धन विभाग

पशुसंवर्धन विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु.१८.०२ लक्ष इतकी वाढ करुन पशुसंवर्धनसाठी एकूण र.रु.३२५.०३ लक्ष इतकी तरतूद केलेली आहे. पशुंच्या दुग्ध वाढीसाठी क्षार व जीवनसत्व औषध पुरवठा करणेसाठी रक्कम रु.४०.०० लक्ष, दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी वंध्यत्व निवारण कार्यक्रम अंतर्गत रक्कम रु.१०.०० लक्ष वाढ करून रक्कम रु.४०.०० लक्ष इतकी भरीव तरतूद केलेली आहे.

आर्थिकदृष्टया मागासलेल्या शेतकरी व शेतमजूर यांना चार शेळया व एक बोकड वाटप योजनेसाठी रक्कम रु.४०.०० लक्ष, पशुपालकांना मिल्कींग मशीन पुरविणेसाठी रक्कम रु.३०.०० लक्ष इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

• स्तनदाह निर्मुलन कार्यक्रम यासाठी रक्कम रु.१०.०० लक्ष तसेच देशी कुक्कूट पक्षी संगोपन करणाऱ्या कुक्कूट पालकांना प्रोत्साहनपर अनुदान यासाठी रक्कम रु.१.०० लक्ष इतकी तरतूद या नविन योजनांचा अंतर्भाव केलेला आहे.


★सार्वजनिक आरोग्य विभाग :-

आरोग्य विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु.७८.४२ लक्ष इतकी वाढ करुन आरोग्य विभागासाठी एकूण र.रु.४३०.३१ लक्ष इतकी भरीव तरतूद केलेली आहे.

• प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी औषधे खरेदीसाठी र.रू.१००.०० लक्ष, • श्वानदंश लस, सर्पदंश लस खरेदीसाठी रक्कम रु.२०.०० लक्ष, जिल्हास्तर / तालुकास्तर/ प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर/उपकेंद्र स्तर वीज, पाणी, दुरध्वनी, इंधन, कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया सर्जन वाहन इंधन इ. या योजनेत रक्कम रु.२५.०० लक्ष इतकी वाढ करुन त्यासाठी रक्कम रु.१००.०० लक्ष इतकी भरीव तरतूद केलेली आहे.

• ग्रामीण जनतेला असाध्य रोगावरील उपचारासाठी अर्थसहाय्य यासाठी रक्कम रु.१६.०० लक्ष वाढ करुन चालू अंदाजपत्रकात र.रु.३०.०० लक्ष इतकी भरीव तरतूद केलेली आहे.

• प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राकडील जैव घनकचरा विल्हेवाट लावणे यासाठी रक्कम रु.३०.०० लक्ष तसेच कार्यालयाच्या देखभाल व दुरुस्ती या सुविधांसाठी रक्कम रु.१०.०० लक्ष इतकी तरतूद करुन या नविन योजनांचा समावेश करणेत आलेला आहे.

★ समाजकल्याण विभाग :-

समाजकल्याण विभागासाठी रक्कम रू.२१६.१८ लक्ष व अपंग कल्याण निधीसाठी रक्कम रू. २२५.०५ अशी एकूण र.रु.४४१.२३ लक्ष इतकी भरीव तरतूद केलेली आहे.

• शेळीपालन गट अनुदान रक्कम रु.२५.०० लक्ष,

• ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणासाठी रक्कम रु.४०.०० लक्ष,

• व्यवसाय व तांत्रिक प्रशिक्षण योजनांतर्गत Tally (संगणक) प्रशिक्षणासाठी रक्कम रु.४०.०० लक्ष इतकी तरतूद करणेत आलेली आहे.

भजनी मंडळास साहित्य पुरविणेसाठी रक्कम रु.२०.०० लक्ष, मागासवर्गीय वसतीगृहांना वाटर प्युरीफायर मशिन पुरविणेसाठी रक्कम रु.२०.०० लक्ष, मागासवर्गीय बचत गटांना केटरींग साहित्य, साऊंड सिस्टीम, मंडप साहित्यांकरिता अर्थसहाय्य यासाठी रक्कम रु.१०.०० लक्ष तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी समाज मंदिरांमध्ये वाचनालये तयार करणे यासाठी रक्कम रु.४६.०० लक्ष या नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश करुन त्यासाठी भरीव तरतूद केलेली आहे.

दिव्यांगासाठी या अर्थ संकल्पात दिव्यांग पुनर्वसन केंद्र यासाठी रक्कम रु.३०.०० लक्ष, दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट किट यासाठी रक्कम रु.१०.०० लक्ष, क्रिडा प्रबोधिनी आयोजित करणेसाठी रक्कम रु.१५.०० लक्ष दिव्यांगाना स्पर्धा परीक्षेकरिता वाचनालये तयार करणेसाठी रक्कम रु.२७.०० लक्ष तसेच दिव्यांगाना कला अॅकॅडमी अनुदान यासाठी रक्कम रु.२०.०० लक्ष तरतूद करुन अपंगांच्या कल्याणासाठी नविन योजनांचा समावेश करणेत आलेला आहे.


* महिला व बालकल्याण विभाग:- 

महिला व बाल कल्याण विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम

रु. ३९.९९ लक्ष इतकी वाढ करुन एकूण र.रु.३२१.०६ लक्ष इतकी तरतूद केलेली आहे. * ग्रामीण पाणी पुरवठा विभाग:- ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी चालू अंदाजपत्रकात एकूण र.रु. २३०.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.


* लघु पाटबंधारे:- 

लघु पाटबंधारे विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु.७५.०० लक्ष इतकी वाढ करुन एकूण र.रु. २००.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.


* शिक्षण विभाग :-

शिक्षण विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु.१५.०६ लक्ष इतकी वाढ करुन शिक्षण विभागासाठी एकूण र.रु.५७१.१० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.

• जिल्हा परिषद शाळांना संगीत साहित्य उपलब्ध करुन देणेसाठी रक्कम रु.१०.०० लक्ष,

• जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या देखभाल, दुरुस्ती व इतर अनुषंगिक खर्चासाठी रक्कम रु. २२५.०० लक्ष इतकी भरीव तरतूदी करणेत आलेली आहे.

• इ.५वी ते ८वी स्कॉलरशिप परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे फी भरणेसाठी रक्कम रु.२०.०० लक्ष, स्काऊट गाईड / कबबुलबुल साठी रक्कम रु.१०.०० लक्ष

• विद्यार्थ्यांचे संपादणूक पातळी वाढविणेकरिता शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देणे यासाठी रक्कम रु.३०.०० लक्ष तसेच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करणेसाठी शाळेतील ग्रंथालय समृध्द करणे या नविन योजनांसाठी रक्कम रु.४०.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.


* बांधकाम विभाग :-

बांधकाम विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु.५३.०० लक्ष इतकी वाढ करुन एकूण र.रु.१०४०.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या आरोग्य सेविका सुप्रिया जगताप सावित्रीबाई फुले नॅशनल अवॉर्डने सन्मानित

Next Post

सीईओ संदीप कोहिणकर का झाले ‘भावुक’ ; मला पांडुरंगाच्या पुण्यभूमीत…; भोसलेंनी केले यासाठी अभिनंदन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सीईओ संदीप कोहिणकर का झाले 'भावुक' ; मला पांडुरंगाच्या पुण्यभूमीत...; भोसलेंनी केले यासाठी अभिनंदन

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972812
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group