सोलापूर : युवक काँग्रेस पदाधिकारी निवडीत उमेदवार निश्चिती वरून काँग्रेस पक्षात अंतर्गत वादाला तोंड फोडले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील नेते माजी प्रवक्ता बसवराज बगले यांनी आपल्याच नेत्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवडीला आव्हान देत आमदार प्रणिती ताईंना युवक पदाधिकारी निवडीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का? काँग्रेसचे प्रसिद्ध झालेले पत्र बोगस आहे, फेक आहे, निवडणूक प्रक्रिया व मतदार नोंदणी 12 डिसेंबर पर्यंत असताना ती प्रक्रिया मध्येच थांबविण्याचा अधिकार प्रदेश कार्याध्यक्षांना आहे का? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
ही बातमी प्रसिद्ध होताच युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बगले यांना टार्गेट केले.विद्यमान युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, नगरसेवक विनोद भोसले, युवक शहराध्यक्ष उमेदवार गणेश डोंगरे, वाहिद विजापुरे, जिल्ह्याचे गौरव खरात यांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला. बगले राष्ट्रवादी काँग्रेस मधून काँग्रेस पक्षात आले आहेत, त्यांनी केवळ दक्षिण सोलापूर तालुक्या पुरते मर्यादित रहावं, जिल्ह्याचा नेता व्हायचा प्रयत्न करू नये या भाषेत धमकी वजा इशारा कार्यकर्त्यांनी दिला, पहा काय म्हणाले, करगुळे…..

















