सोलापूर : बळीराजा पार्टीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब रास्ते यांच्या उपस्थितीमध्ये वन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
यावेळी बळीराजा पार्टीचे बार्शी तालुकाध्यक्ष सोलापूर जिल्हा अध्यक्ष बालाजी पुजारी, प्रवीण काकडे, अमर शेळके, मनोज कोकाटे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह इतर सदस्य उपस्थित होते.
रास्ते म्हणाले, बळीराजा पार्टी वन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी आवाज उठवत आहे, वन कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून हक्काची नोकरी द्यावी अन्यथा बळीराजा पार्टी रस्त्यावर उतरेल असा इशारा रास्ते यांनी दिला. यानंतर बळीराजा पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा देण्यात आला.


















