सोलापूर : देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा विद्यमान खासदार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले सोलापुरातील सर्व स्तरातील मान्यवरांनी आपले प्रश्न समस्या पवार साहेबांसमोर मांडल्या. ते सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सोलापुरातून बारामती कडे रवाना झाले.
दरम्यान दुसऱ्याच दिवशी शनिवारी सकाळी बंजारा समाजातील युवा नेते युवराज राठोड यांनी प्रदेशचे युवक सरचिटणीस प्रशांत बाबर, अकबर शेख ,माळप्पा गण्यार यांच्या सोबतीने शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली,या भेटीदरम्यान अनेक सामाजिक व राजकीय विषयावर चर्चा झाली व युवराज राठोड यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा अहवाल साहेबांकडे सादर केला.
सोलापूर हद्दवाढ होऊन ३० वर्ष झाली पण सोयी सुविधाचां अजून हि पूर्ण झालेल्या नाहीत त्यासाठी आवश्यक विशेष निधीची तरतूद होणे गरजेचे आहे या संदर्भात संबंधितांना आदेश देण्याची विनंती केली. सोलापूर जिल्हा बंजारा समाजाच्या वतीने विमुक्त जाती व भटक्या जमाती यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दहा मागण्यांचे निवेदन युवराज राठोड यांनी शरद पवार यांना दिले.
युवराज राठोड यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी पक्ष सोडून वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला होता या पक्षाकडून त्यांनी दक्षिण सोलापूर मतदार संघात विधानसभा निवडणूक लढवत आपलं कर्तृत्व सिद्ध केलं होतं, जरी ते वंचित मध्ये असले तरीही त्यांची नाळ राष्ट्रवादी सोबतच जोडण्याचं दिसून आलं शनिवारी साहेबांची भेट घेऊन त्यांनी पुन्हा पक्षांमध्ये सक्रिय होण्याचे संकेत दिले असल्याची माहिती मिळाली.


















