सोलापूर : बार्शी तालुक्यातील पांगरी परिसरात असलेल्या फटाका कारखान्यात आग लागून स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान पांगरी जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्य रेखा राऊत यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी मागणी केली आहे की, माझ्या मतदारसंघातील पांगरी-शिराळे भागात एक दुर्दैवी घटना घडली आहे.
एका फटाका कारखान्यात भीषण स्फोट होऊन त्यामध्ये भाजून मरण पावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये तर जखमी झालेल्या मजुरांना 5 लाखाची शासकीय मदत मिळावी. त्याचप्रमाणे सर्व जखमींना मोफत व वेळेवर उपचार करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.



















