महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड करण्यात झाली त्यानंतर त्यांनी उपाध्यक्ष तसेच विविध कार्याध्यक्ष यांची निवड केली त्यामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांना प्रदेश कार्याध्यक्ष पद मिळाले होते राज्याची कार्यकारणी नवीन जाहीर झाल्याने निश्चितच सर्व जिल्ह्यांमध्ये पदाधिकारी बदलाची चर्चा रंगू लागली सोलापूर शहर जिल्ह्यातील अध्यक्ष बदलावे अशी मागणी झाली, यामध्ये विशेष करून जिल्हाध्यक्ष बदल होईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली, याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिनांक 4 ते 10 मार्च दरम्यान काही जिल्ह्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक लावली होती त्यामध्ये आठ मार्च रोजी सोलापूर जिल्ह्याला बोलावण्यात आले होते त्यामुळे या बैठकीत निश्चितच जिल्हाध्यक्ष बदलाची चर्चा होईल अशी शक्यता होती यासाठी अनेक जण उत्सुक होते जिल्हाध्यक्षपदासाठी अनेकांची नावे चर्चेला जात आहेत यामध्ये माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे धवलसिंह मोहिते-पाटील पंढरपूरचे प्रकाश पाटील माढयाचे दादासाहेब साठे यांच्या नावाची चर्चा आहे यामध्ये सिद्धाराम म्हेत्रे त्यांनी जर नकार दिला तर त्यासाठी सुरेश हसापुरे हे सर्वाधिक इच्छुक आहेत पण पक्षाने आपल्या नावाचा विचार करावा अशी त्यांची अपेक्षा आहे जिल्ह्यातील सर्वच नेत्यांसोबत जवळचे संबंध असल्याने आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी सुरेश हसापुरे यांच्या मास्टर माईंड डोक्याचा फायदा निश्चितच काँग्रेसला होणार आहे मात्र आठ मार्च रोजी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी बोलावलेली बैठक काही कारणास्तव पुढे ढकलली असून तसे पत्र सर्व जिल्ह्याला पाठवण्यात आलय.