सोलापूर शहरामध्ये वाहने पार्किंग करण्यासाठी मोठ्या अडचणी आहेत. सोलापूर शहरांमध्ये नवी पेठ, बेगम पेठ, अशोक चौक, 70 फूट रोड अशा ठिकाणी बाजारपेठ मोठ्या प्रमाणात आहे मात्र या ठिकाणी कुठेही स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नाही त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या समोरचा परिसर तसेच जिल्हा न्यायालयाच्या समोरच्या परिसरात शासकीय कार्यालये असल्याने,झेरॉक्स टायपिंगची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत तसेच बँकाही आहेत त्यामुळे नागरिक आपली काही कामे असतील, झेरॉक्स काढायला आले असतील बँकेमध्ये काम असेल तर आपली वाहने बाहेर लावतात, नागरिक आतमध्ये गेले वाहतूक शाखेचे वाहन गाडी उचलून आत मध्ये घालते आणि ते जेल रोड पोलिस ठाण्याच्या पाठीमागच्या परिसरात नेऊन ठेवते. काही नागरिक गाड्या सोडा म्हणून ओरडतात, विनवणी करतात, मात्र गाड्या सोडल्या जात नाहीत, अशीच परिस्थिती सर्व शहरात पहायला मिळते, मंगळवारी एका व्यक्तीची गाडी उचलली तो ओरडू लागला, गाडी खाली ओढू लागला, गाडी सोडा म्हणून शेवटी तो वाहनावर चढून गाडी सोबत गेला.
जिल्हा परिषदेच्या समोर तर चित्र वेगळेच असते उपोषण गेट समोर चार चाकी वाहने सर्रास पार्किंग केली जातात, ते पण भर रस्त्यात वाहने लावली जात आहेत, जिल्हा परिषद उपोषण गेटवर पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त असतो, पण त्यांचे ही तिकडे लक्ष जात नाही, वाहतूक शाखेचे एकही कर्मचारी नसतो. त्यामुळे या वाहनांना हटवण्यात पोलिसांमध्ये डेरिंग नाही का?असा सवाल सर्वसामान्य माणूस विचारत आहे.
पूर्वी रस्त्यात लावलेल्या चार चाकी वाहनांना जॅमर बसवले जात होते नंतर दंड घेऊन जॅमर काढले जात होते, आता तसे कुठेच होताना दिसत नाही.





















