सोलापूर : केंद्र सरकारने सुरू केलेल्या अग्निपथ या योजनेला आता संपूर्ण देशभरात विरोध होऊ लागला आहे. बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागात आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे.
रेल्वे गाड्या जाळल्या जात आहेत. अग्निपथ योजनेंतर्गत युवकांना 4 वर्ष देशाच्या सैन्यदलात सेवा करता येणार आहे. याला तीव्र विरोध होऊ लागला आहे. अग्निपथ’ ही चार वर्षासाठी भारतीय सैन्यातील भरती म्हणजे आयुष्यभराची बेरोजगारी आहे.
ही योजना आणून मोदी सरकारने देशातील बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा केली आहे असा आरोप होत असून युवा वर्ग आक्रमक झाला आहे. सोलापुरात रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून सदर बाजार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांचे पथक सर्वत्र लक्ष ठेवून आहे. दरम्यान काही संशयित युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे दिसून आले.


















