Sunday, April 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पैलवान जोमात अन् एमआयएम कोमात ; एमआयएमच्या “ऍक्टिव्हिटी”थंडावल्या.

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 July 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहरांमध्ये राजकीय वर्तुळात जुलै महिना पाहिला तर आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांच्या राजकीय ऍक्टिव्हिटी पाहायला मिळाल्या. काँग्रेस पक्षाने आता आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस घराघरात, कॉंग्रेस मनामनात ही मोहीम सुरू केली आहे. शिवसेनेने शिव संपर्क अभियानाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील सर्वच प्रभाग पिंजून काढले. जिल्हाप्रमुख, शहर प्रमुख, विरोधी पक्षनेते सर्वत्र फिरले. भारतीय जनता पार्टी आमदार विजय देशमुख यांच्या माध्यमातून आपल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या माध्यमातून मोर्चेबांधणी करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची तर शहरात दिवसेंदिवस ताकत वाढताना दिसत आहे, नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश कार्यक्रम घेतला यामध्ये एमआयएम नगरसेवक तोफिक शेख यांनी आपल्या अनेक समर्थक कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पाठवले. पैलवान यांनी खेळी करत आपला व इतर नगरसेवकांचा प्रवेश मात्र रोखून ठेवला आहे. मुलाला प्रवेश दिला मात्र स्वतः त्या स्टेजवर  अजिबात गेले नाहीत, मात्र शेजारीच राष्ट्रवादी काँग्रेसच्याच संतोष पवार यांच्या दमदार अजितदादा पवार या गीताच्या लॉंचिंगच्या स्टेजवर ते जयंत पाटलांसोबत होते.

प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये 2 नई जिंदगी, 2 शास्त्री नगर, 2 मौलाली चौक, 2 विजापूर वेस, 2 फॉरेस्ट, 2 बेगम पेठ, 2 पाच्छा पेठ, 2 राहुल गांधी झोपडपट्टी अशा विविध मुस्लिम भागातील कार्यकर्त्यांना तौफिक पैलवानने प्रवेश देत एमआयएमला डोकेदुखी केली. नावालाच एमआयएम नगरसेवक आहेत मात्र पुर्णतः तौफिक शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे झाले आहेत, 

गटनेते रियाज खरादी यांची तर भूमिका कुणालाही न समजणारी आहे, त्यांच्या सुपीक डोक्यात काय चाललंय हे अजूनही एमआयएम शहराध्यक्ष फारूक शाब्दी आणि तौफिक शेख यांना समजले नाही, शाब्दी आले की त्यांच्या कार्यालयात येतात, ते गेले की पैलवान यांना जवळ करतात, ही खरादी यांची “कामचलाऊ” भूमिका त्यांना स्वतःला भविष्यात महापालिका निवडणुकीवेळी त्रासदायक आणि अडचणीची ठरणारी आहे, 

जुलै महिन्यात एमआयएम पक्षाने एक ही ऍक्टिव्हिटी केली नाही, कोणते निवेदन दिसले नाही, आंदोलन नाही, कोणता विशेष कार्यक्रम नाही, नगरसेवक गाझी जहागीरदार यांचा जंगी वाढदिवस  आणि  मेडिकल विंगचा कार्यक्रम सोडला तर महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने जे अपेक्षित पाहिजे तसे ठोस काही दिसले नाही. एमआयएमची महिला आघाडी तर पहायला सुध्दा मिळत नाही, गॅस दरवाढ, महागाईवर जनता वैतागली आहे, असे असताना कुणी आवाज उठवताना दिसत नाही.

SendShareTweetSend
Previous Post

गणपतराव देशमुख यांनी 11 निवडणुकीत केला या नेत्यांचा पराभव ; एक नेता तर 5 वेळा निवडणूक हरला

Next Post

ब्रेकींग ! बिबट्याचा अकोलेकाटी गावात शेतकऱ्यावर हल्ला, पहा गावातील हे व्हिडीओ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! बिबट्याचा अकोलेकाटी गावात शेतकऱ्यावर हल्ला, पहा गावातील हे व्हिडीओ

ताज्या बातम्या

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1974734
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group