सोलापूर शहरातील मुस्लिम समाजात एमआयएम नगरसेवक तौफिक पैलवान आणि एमआयएम शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांचीच बऱ्यापैकी चर्चा असते, फारूक शाब्दी यांनी विधानसभा लढवली, त्यांनी पैलवान एवढीच मते घेतली, मुस्लिम समाजात त्यांचे नाव झाले, त्यांची क्वालिटी व आर्थिक स्थिती पाहून पक्षाने शहरासह जिल्ह्याचे सुद्धा अध्यक्ष पद दिले, पण ते कसे मिळाले, कशा पद्धतीने घेतले, एमआयएमच्या अनेकांना ठाऊक आहे. त्यानंतर तौफिक शेख हे विजापूर तुरुंगातून सुटून आल्यापासून ते एमआयएम पासून एक हात (घड्याळ)दूरच आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी आपला घरोबा वाढवला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, अजितदादा, जयंत पाटील, यांच्या भेटी घेतल्या,पालकमंत्री भरणे, आमदार संजयमामा शिंदे यांच्या ते कायम टच मध्ये आहेत, जवळजवळ 10 महिने होऊन गेले मात्र पैलवान यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश काही केल्या होताना दिसत नाही.
एमआयएम वाल्यांच्या नजरा ही त्याकडे लागल्या आहेत, कधी एकदा पैलवान राष्ट्रवादीत जातोय ते. पैलवान जरी सध्या एमआयएम चे नगरसेवक असले तरी त्यांनी ताज सोशल ग्रुपच्या माध्यमातून आपलं कार्य सुरू ठेवले आहे. मधल्या काळात विषय समिती निवडणूक, स्थायी समिती सदस्य व सभापती निवडीत अनेक घडामोडी घडल्या, गटनेते रियाज खरादी यांनी आपल्या चलाख डोक्याचा वापर करत फारूक शाब्दी व तौफिक पैलवान या दोन्ही नेत्यांना ही “…..” बनवले’ तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यास फारूक शाब्दी हे दपकले. किती जणांना पक्षातून काढायचे सगळेच गेले तर ‘पोरं-ठोर’ च पक्षात राहतील हे त्यांना समजले.
तौफिक शेख यांच्यावर एमआयएम पक्ष कधी कारवाई करतोय यांची वाट पैलवान विरोधक व एमआयएमचे कार्यकर्ते पहात आहेत, मात्र पैलवान राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असले तरी त्यांनी एमआयएम पक्षाच्या विरोधात कोणतही कट कारस्थान केल्याचे दिसले नाही, म्हणूनच पक्ष पैलवान वर अजून कारवाई करताना दिसत नाही. सध्या पैलवान मामांच्या संपर्कात राहून आपले काम सुरू ठेवले आहे. मामा नेमके कोण? हे अनेकांना माहिती आहे.
फारूक शाब्दी हे महिन्यावर एकदा किंवा दोन वेळा सोलापूरला येतात, ते मोठे उद्योजक असल्याने सोलापूर को जादा टाइम देना उनको थोडीशी मजबुरी है. अजून ही त्यांना शहराध्यक्ष पदाला न्याय देता आलेला नाही, ते प्रयत्न करतात मात्र त्यांना अनुभवी राजकिय मार्गदर्शक मिळत नाही, अपेक्षित पक्ष वाढ झालेली नाही, पोरां-ठोरांवर सध्या पक्ष चालला असल्याचे चित्र आहे. निवडणूका आल्या की ओवेसी बंधू येतात, भाषण देतात, समाजात स्फुलिंग चेतवतात यांच्याच जोरावर त्या जिंकल्या जातात, हेच एमआयएम मध्ये चालत आलंय, पूर्वी तौफिक पैलवान, आता फारूक भाई, उद्या दुसरा कुणी दिसला तर नवल नको.




















