ठाणे :- महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस तर्फे सम्पूर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या विरोधात वाढत्या महागाई विरोधात राज्यव्यापी पदयात्रांचे आयोजन केले असुन त्याचाच एक भाग म्हणुन आज रोजी महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस व ठाणे जिल्हा कांग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, महिला प्रदेश अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर आणि वाढत्या महागाईच्या विरोधात आज ठाणे जिल्हा मध्यवर्ती काँग्रेस कार्यालय येथून हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले कि मोदी सरकार सत्तेवर आल्यापासुन महागाई प्रचंड वाढत असुन पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दर सतत वाढवत असुन यामुळे महिलांवार त्याच्या प्रत्यक्ष बोजा पड़त असुन ते सहन करण्यापालिकडचे आहे. सततचे दरवाढ पाहुन असेच म्हणावे लागेल की ” पेट्रोल डिझेल, आगे बढ़ो LPG आपके साथ है”. मोदी सरकार महिलांना तुच्छ समजतात, महिला अत्याचार वाढले, घरगुती हिंसाचार वाढले असुन, महिलांवार अन्याय करणारा मोदी सरकारचा निषेध करत मोदी सरकार चले जाव असे म्हणाल्या.
यावेळी ठाणे काँग्रेस महिला अध्यक्षा शिल्पाताई सोनवणे, ठाणे शहर अध्यक्ष विक्रम चव्हाण, ठाणे शहर जिल्हा महिला कांग्रेस कांग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या हल्लाबोल मोर्चा मध्ये सहभागी झाले होते.