सोलापूर- माणसाला जिथे शेवटचा निरोप दिला जातो त्या वैकुंठधामाला जाताना आलेल्यांना गवत व झुडपामुळे चालता येईना..यावेळी पाहुण्याकडुन झालेली अवेलना ही काही नागरीकांनी युवा मंच अध्यक्षाला सांगितली. तेव्हा काही क्षणात जेसीबी,टँकर व असंख्य हात पुढे आले अन् स्मशानभूमीत असलेल्या कचरा,गवत,काटेरी झुडपाचे विसर्जन करुन परिसर टकाटक झाला.या उपक्रमाचे नागरीकाकडून थोंडभरुन कौतुक होत आहे.
त्यांचे झाले असे की गुळवंची येथील जेष्ठ नागरीक नागनाथ नवगिरे यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी आप्तजन,पाहुणे, नातेवाईक आले, स्मशानभूमीत जाताना गवत,काटेरी झुडपे, असल्याने धड चालता देखील येत नव्हते. यावेळी काय घाण काय रस्ता, काय स्मशानभुमी अशी चर्चा करीत असल्याचे गावातील दिपक झांजले,संतोष कवडे यांनी ऐकले व ही बाब पृथ्वीराज माने युवा मंचचे अध्यक्ष,ग्रामपंचायत सदस्य सुनिल जाधव यांना सांगितली .
जाधव यांनी चालु कामावरील जेसीबी,टँक्टर मागवून,युवकांनी स्मशानभूमीतील साफसफाई केली. तर संभाजीनगर येथील डीपीमुळे अनेक वर्ष बंद असलेला रस्ता देखील जाण्या- येण्यासाठी चकाचक केला. युवामंचच्या या कामाचे गावातील नागरीकांनी कौतुक केले.




















