सोलापूर, दि.8 (जिमाका): प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी 31 मार्च 2022 पर्यंत ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन निवास उपजिल्हाधिकारी तथा योजनेच्या जिल्हास्तरीय नोडल अधिकारी शमा पवार यांनी केले आहे.
ई-केवायसी ओटीपी किंवा बायोमॅट्रीक प्रणालीद्वारे करण्यासाठी पोर्टलवर पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. त्यामध्ये संबंधित लाभार्थी शेतकरी यांनी पी. एम. किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये किंवा पी.एम किसान अॅपद्वारे ओटीपीद्वारे लाभार्थ्यांना स्वत: ई-केवायसी प्रमाणिकरण मोफत करता येईल.
तसेच ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) केंद्रावर ई-केवायसी प्रमाणिकरण बायोमेट्रीक पध्दतीने करता यईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रावर (सीएससी) बायोमॅट्रीक पध्दतीने ई-केवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी प्रति लाभार्थी प्रति बायोमॅट्रीक प्रमाणिकरण दर 15 रूपये निश्चित करण्यात आला आहे.
पी. एम किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना एप्रिल- जुलै 2022 या कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापूर्वी ई-केवायसी प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे श्रीमती पवार यांनी सांगितले.

















