Sunday, March 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांची भीमा कालवा मंडळाने केली पाठराखण , उजनी पाणी वाटप नियोजनाच्या बातम्या चुकीच्या ; मग खरी वस्तुस्थिती काय?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 October 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर,दि.11: भीमा उजनी प्रकल्प पाणी वापर फेरनियोजनाच्या ताळेबंदाबाबत शासनाने 6 ऑक्टोबर 2021 च्या शासन निर्णयान्वये फेरनियोजनास मान्यता प्रदान केली. यामध्ये तृतीया सुप्रमा अहवालानुसार लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी 16.140 दलघमी तरतूद दर्शवली असून फेरनियोजनाप्रमाणे ही तरतूद 25.484 दलघमी दर्शविण्यात आली आहे. 7 ऑक्टोबरला दैनिक लोकमत आणि त्यानंतर विविध दैनिकात 9 ऑक्टोबर 2021 रोजी प्रसिध्द झालेली बातमी वस्तूस्थितीला धरून नाही, पाणी वापराचे परिमाण वस्तूनिष्ठ नाही, असा खुलासा भीमा कालवा मंडळाचे सहायक अधीक्षक अभियंता यु.आर. जानराव यांनी दिला आहे.

याबाबतची वस्तूस्थिती अशी आहे, सन 2004 मध्ये उजनी प्रकल्पास द्वि तीय सुधारीत प्रशासकिय मान्यता प्राप्त होती. या अहवालामध्ये लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी 0.90 टीएमसी म्हणजेच 25.484 दलघमी इतक्या पाणी वापराची तरतुद करण्यात आली होती. तसेच प्रवाही कालव्याच्या लाभक्षेत्रासाठी 32.15 टीएमसी म्हणजेच 910.33 दलघमी इतक्या पाणी वापराची तरतूद होती.

सन 2014 मध्ये मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून या योजनेसाठी 2.04 टीएमसी म्हणजेच 57.763 दलघमी पाणी वापराची तरतूद करण्यात आलेली होती. सन 2019 मध्ये उजनी प्रकल्पाच्या तृतीय सुधारीत मान्यतेमध्ये लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी 0.90 टीएमसी 25.484 दलघमीऐवजी 0.57 टीएमसी 16.140 दलघमी व मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी 1.01 टीएमसी 28.598 दलघमी तरतूद आहे. तसेच प्रवाही कालव्याच्या लाभक्षेत्रासाठी 34.51 टीएमसी 977.151दलघमी इतक्या पाणी वापराची तरतूद आहे.

उजनी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या भीमा, सीना व माण नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व उजनी प्रकल्पाचे लाभक्षेत्र आच्छादित होत असून ज्या भागात नदीवरुन सिंचन होत आहे. या आच्छादित क्षेत्राचा अभ्यास करुन भीमा उजनी प्रकल्पाचा शासन निर्णय 6 ऑक्टोबर 2021 अन्वये फेरनियोजन करण्यात आला आहे. नियोजनानुसार उजनी प्रकल्पाचा  द्वितीय सुधारित मान्यता अहवालातील मान्यतेनुसार लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना 0.90 टीएमसी(25.484 दलघमी), आणि सन 2014 मध्ये मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला शासनाने दिलेल्या प्रशासकीय मान्यतेनुसार 2.04 टीएमसी म्हणजेच 57.763 दलघमी अशी तरतूद पुनर्स्थापित ठेवण्यात आलेली आहे.

भीमा प्रकल्पाच्या सुधारित मंजुर जलनियोजनामुळे कृष्णा पाणी तंटा लवाद -1 यांनी भीमा प्रकल्पास मंजूर केलेल्या एकूण पाणी नियोजनात कोणताही बदल होत नाही, असा खुलासा जानराव यांनी केला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! नवे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी पदभार घेतला ; म्हणाले गुन्हेगारीवर “अंकुश” कायम राहील

Next Post

नवरात्र उत्सवात महिला सक्षमीकरनाचा जागर…,प्रार्थना फाऊंडेशनकडून मोफत शिलाई मशीन ट्रेनिंग सेंटर सुरू

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

नवरात्र उत्सवात महिला सक्षमीकरनाचा जागर...,प्रार्थना फाऊंडेशनकडून मोफत शिलाई मशीन ट्रेनिंग सेंटर सुरू

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971602
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group