सोलापुरातील कौतम चौक महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभिकरणं कामासाठी बसवेश्वर सर्कलच्या वतीने नगरसेवक जगदीश पाटील, अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे, गुरुराज पदमगोंडा यांनी गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभिकरणं कामासाठी निधीची मागणी केली होती.
याकरिता तात्काळ निधी मंजूर केल्याबद्दल विमानतळावर बसवेश्वर सर्कलच्या वतीने सत्कार करण्यात आला होता. याचे स्वतः दस्तरखुद्द राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या अधिकृत फेकबुक पेज वरून सत्काराबद्दल आभार मानले.


















