सोलापूर : राज्यात शिंदे फडवणीस सरकार स्थापन झाले. त्यामुळे भाजप समर्थक शिवसेनेचे कार्यकर्ते जाम खुश आहेत. आता काँग्रेस व राष्ट्रवादीवर हल्लाबोल करण्यास सुरुवात झाली आहे.
मोहोळ शिवसेनेचे युवा नेते सोमेश क्षिरसागर यांनी नव्याने आलेल्या शिंदे फडणवीस सरकारचे नैसर्गिक युती या शब्दात स्वागत केले. या सरकारने पहिल्यांदा पालकमंत्री असताना दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातून पाणी पळवलेल्या लाकडी निंबोडी या ही योजना रद्द करावी अशी मागणी केली…


















