सोलापूरच्या मीडिया क्षेत्रात गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रामाणिक काम करत असलेले लोक प्रधान न्यूज चैनल चे पत्रकार अकबर बागवान यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सोलापूर शहर प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे…
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट डॉक्टर पी बि कुंभार, मुख्य कार्याध्यक्ष रवींद्र कुंभार यांनी ही निवड केली आहे…
.. 30 ऑगस्ट रोजी त्यांच्या नियुक्ती पत्रा चा कार्यक्रम सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाला..
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सोलापूर शहर प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम करत असताना ओबीसी समाजाच्या ज्या काही अडचणी असतील, त्यांच्या समस्या प्रश्न असतील, त्या समोर आणून, ओबीसी समाजातील सर्व समाज घटकांना न्याय देण्यासाठी काम करावे, ओबीसी समाजातील विविध जाती जमाती च्या उन्नतीसाठी कार्य करावे अशा शुभेच्छा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट डॉक्टर पी बि कुंभार यांनी दिल्या आहेत…
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अविनाश मार्तंडे, शहराध्यक्ष भारत मनसा वाले, मुख्य कार्याध्यक्ष रवींद्र कुंभार, जनरल सेक्रेटरी सुभाष मुळे, प्रदेशाध्यक्ष एडवोकेट डॉक्टर पी बि कुंभार, महामुनी सर, ये रनाळे, संतोष पाटील, बंडगर काका, पत्रकार नारायण घंटे आदी उपस्थित होते.


















