सोलापूर : येथील ज्योतिषाचार्य पंडित नीलकंठ परदेशी मठ यांनी अनुवाद केलेल्या कोण हे यतीवर या ग्रंथाचे प्रकाशन नुकतंच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं .यावेळी सोलापूरचे खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य उपस्थित होते.
पंतप्रधानांनी हा चरित्र ग्रंथ पाहून आस्थेने माहिती घेतली आणि नीलकंठ परदेशी मठ यांना शुभेच्छा दिल्या. वयाच्या आठव्या वर्षी ऋग्वेद कंठस्थ असलेले विजय नगर साम्राज्याचे राजगुरू वंशात जन्मलेले श्री विद्यावाचस्पती श्री शभुलिंग शिवाचार्य यांचा हा जीवन चरित्र ग्रंथ आहे.
त्यांचं कार्य म्हैसूर, काशी, अलाहाबाद, हंपी येथे झालं आहे. शंभू लिंग शिवाचार्य यांचे नातू नीलकंठ परदेशी यांनी मूळ कानडी भाषेतील या ग्रंथाचं मराठीत अनुवाद केला आहे. पत्रकार परिषदेस प्रकाशक मुद्रक ईश्वर झुंजा उपस्थित होते.

















