सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, तेला उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, अभिषेक रंपुरे, अनिल बागल, दत्ता गाडे, शिवाजी पाटील, अरुण शिरगिरे, नितीन बंगाळे, निलेश घाडगे, सागर बर्गे, महादेव दुबल, सौरभ आयरे, स्वप्नील प्रक्षाळे, वैभव लोंढे यांचा सहभाग होता.
पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड या गावात पाणीपुरवठा विभागाची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच दोषी अधिकाऱ्यांवर आणि ग्रामपंचायतीवर कारवाई करावी या मागणीसाठी या आंदोलन करत असल्याचे पाटील यांनी सांगितले..



















