सोलापूर : भाजपाचे आमदार नितेश राणे व त्यांची फॅमिली सोमवारी तुळजापूर दौऱ्यावर असून त्यांचे सकाळी साडेअकरा वाजता सोलापूरच्या विमानतळावर आगमन झाले यावेळी नेते कार्यकर्त्यांची त्यांच्या स्वागताला मोठी उपस्थिती होती जिल्हा परिषदेचे सभापती विजयराज डोंगरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, महापालिकेचे माजी उपमहापौर राजेश काळे, सुनील खटके, अमोल गायकवाड, प्रा. पी बी रोंगे, संजय पाटील यांच्यासह राणे समर्थक कार्यकर्त्यांनी स्वागताला गर्दी केली होती.
यावेळी माध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. एम आय एम या पक्षालाही हिंदुत्व विरोधी असे म्हणत संजय राऊत सारखी माणसं सोलापुरातच्या बाजारात कितीतरी विकत मिळतात या शब्दात त्यांनी राऊत यांच्यावर तोंडसुख घेतले..


















