सोलापूर : ग्रामीणचे नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी मावळत्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडून शनिवारी सायंकाळच्या सुमारास भार घेतला. अधीक्षक सातपुते यांनी सरदेशपांडे यांचे सोलापुरात स्वागत केले. दरम्यान सरदेशपांडे यांनी पदभार घेतला मात्र रविवारी सकाळी साडेअकरा वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत
ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी पोलीस अकादमी नाशिकचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेजस्वी सातपुते यांना अद्यापही पदस्थापना मिळालेली नाही.
राज्याच्या गृह विभागाने राज्यातील 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये सोलापूर पोलीस अधीक्षक पदी सरदेशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली होती.



















