सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे हे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जॉईन झाले. त्यांनी सर्वप्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली, स्वामी यांनी त्यांचे स्वागत केले, यानंतर ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी रंजना कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट घेत स्वागत केले, कृषी विकास अधिकारी कुंभार, कृषी अधिकारी पाचाकूडवे, वाघमोडे यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली व सत्कार केला.
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कदम यांनी आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांसह धोत्रे यांचे स्वागत केले ,पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव,महिला बालकल्याणचे गिरीश जाधव, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले जिल्हा परिषद कृषी विभागाच्या विशेष घटक योजनेची जिल्हास्तरीय समितीची बैठक आज होती त्याबाबत कृषी विकास अधिकारी कुंभार यांनी धोत्रे यांना बैठकीची माहिती देताच लगेच अर्ध्या तासात आपण बैठक घेऊ आणि प्रकरणांना मंजुरी देऊ हा निर्णय घेतला.























